Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखलपोलीस ठाणे, ढोकी: हनुमंत देवराव थोरात, रा. दाउतपुर, ता. उस्मानाबाद हे दि. 25.06.2020 रोजी 11.00 वा. सु. मौजे दाउतपुर शेत गट क्र. 90 मध्ये पेरणी करत होते. यावेळी गावकरी- दिलीप सोलनकर, उत्रेश्वर सोलनकर, किशोर सोलनकर, विकास पांढरे, बालाजी पांढरे, पप्पु भांगे, सोमनाथ लोखंडे, रोहीत लोखंडे, परमेश्वर नरटे या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून हनुमंत थोरात पेरणी करत असलेल्या ठिकाणी जाउन हनुमंत थोरात यांना शिवीगाळ करुन, पेरणी करण्यास अडवून, पेरणी केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हनुमंत थोरात यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 27.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, येरमाळा:  गणी बाबुलाल मुलाणी, रा. तेरखेडा, ता. वाशी हे दि. 14.06.2020 रोजी 13.15 वा. सु. मौजे तेरखेडा येथील आपल्या शेतात बांधावर होते. यावेळी गावकरी- विकास आडसुळ, धनंजय आडसुळ, भगवान आडसुळ, सुनिल जगताप या चौघांनी शेतमोजणीच्या कारणावरुन गणी मुलाणी यांना शिवीगाळ करुन, काठीने, लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. पती- गणी मुलाणी यांना होत असलेली सोडवण्यास आलेल्या त्यांच्या पत्नी- रोशन यांनाही नमुद आरोपींनी काठीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली व गणी मुलाणी यांचा मोबाईल फोन फोडला. अशा मजकुराच्या गणी मुलाणी यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 27.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, वाशी:  संतोष दिलीप शिंदे, रा. गोजवाडा, ता. वाशी हे दि. 27.06.2020 रोजी 12.30 वा. सु. पारा चौक, वाशी येथील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी भाऊबंद- परमेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे या दोघांनी पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून संतोष शिंदे यांना शिवीगाळ करुन, दगडाने मारहाण केली. तसेच ज्ञानेश्वर शिंदे यांनी संतोष शिंदे यांच्या पोटावर चाकूने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संताष शिंदे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद दोन आरोपीविरुध्द गुन्हा दि. 27.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments