Header Ads

उस्मानाबाद : जुगार अड्ड्यावर छापे


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): कमलाकर पाटील, आदर्श पवार, दोघे रा. बार्शी नाका, उस्मानाबाद व साधु भोसले, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद हे तीघे दि. 27.06.2020 रोजी उस्मानाबाद येथील हॉटेल विश्वजीत च्या पाठीमागे तिरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह एक मोबाईल फोन (किं.अं. 33,990/-रु.) च्या मालासह स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकास आढळुन आले.
पोलीस ठाणे, आनंदनगर: दत्ता तोडकरी, रा. नेहरु चौक, उस्मानाबाद व अशोक वाघमारे, रा. आगडगल्ली, उस्मानाबाद हे दोघे दि. 27.06.2020 रोजी साळवे चौक, उस्मानाबाद येथे कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 4,260/-रु. च्या मालासह स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकास आढळुन आले.
       यावरुन वरील पाचही जणांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

अवैध मद्य विरोधी कारवाई.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): सुशिला काळे, रा. शिंदेवाडी, ता. उस्मानाबाद या दि. 28.06.2020 रोजी आपल्या राहत्या घराच्या बाजूस प्लास्टीक कॅन मध्ये 10 ली. गावठी दारु किं.अं. 710/-रु. अवैध विक्री च्या उद्देशाने बाळगला असतांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) यांच्या पथकास आढळल्या. यावरुन त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.


मोटार वाहन कायदा उल्लंघन: 279 कारवाया- 63,500 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.
उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी दि. 27/06/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुध्द 279 कारवाया केल्या. त्यातुन 63,500 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

No comments