Header Ads

चोरीच्या विद्युत मोटारसह 2 आरोपी ताब्यात


उस्मानाबाद -  उस्मानाबाद एमआयडीसी भागातील एक विद्युत मोटार चोरणाऱ्या दोन चोरट्याना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.

एम.आय.डी.सी. येथील ‘राजकेम प्रोडक्टस’ या कारखान्याचे शटर अज्ञात चोरट्याने दि. 29.05.2020 रोजी मध्यरात्री उचकटून आतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीची 7.5 अश्व शक्ती क्षमतेची विद्युत मोटार (किं.अं.20,000/-रु.) चोरुन नेला होता. यावरुन पो.ठा. आनंदनगर येथे गु.र.क्र. 155/2020 भा.दं.वि. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

            सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी- 1)विजय गोपी राठोड 2)सुनिल नामदेव चौगुले दोघे रा. एम.आय.डी.सी., उस्मानाबाद या दोघांना दि. 05.06.2020 रोजी  ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरीचा वरील मुद्देमाल व चोरी करण्या करीता वापरलेली  होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 7897 ही जप्त केली आहे. उर्वरीत तपासकामी आरोपींस पो.ठा. आनंदनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

            ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- किसन जगताप, प्रमोद थोरात, बाळासाहेब खोत, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.

वाँटेड  आरोपी अटकेत

 पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 79/2012 भा.दं.वि. कलम- 147, 148 या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- अनिल बप्पा काळे, रा. पळसप पारधी पिढी, ता. उस्मानाबाद यास स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 06.06.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि  आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे.

No comments