Header Ads

सासरच्या त्रासास कंटाळून सुनेची आत्महत्या


पोलीस ठाणे, आंबी: सुप्रीया समाधान मोटे, वय 20 वर्षे, यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता 1) समाधान मुरलीधर मोटे (पती) 2)हरिश्चंद्र मोटे (सासरा) 3)जनाबाई मुरलीधर मोटे (सासु) 4)राजकन्या दशरथ कोळेकर (नणंद) सर्व रा. रत्नापूर, ता. परंडा यांनी मागील दोन वर्षापासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. त्यांच्या या त्रासास कंटाळून दि. 17.06.2020 रोजी राहत्या घरी सुप्रीया मोटे यांनी विष प्राशन केल्याने वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या लक्ष्मण भिमराव मिसाळ (मयताचे पिता) रा. पुणे यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 306, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 20.06.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण.
पोलीस ठाणे, कळंब: लक्ष्मी बालाजी भांडे, रा. डिकसळ, ता. कळंब या दि. 20.06.2020 रोजी 19.00 वा. सु. मौजे डिकसळ येथील इस्लामपूरा बाबनगर येथील रस्त्याने पायी चालत जात होत्या. यावेळी प्रदीप दिनकर खेपकर, रा. कळंब याने पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन लक्ष्मी भांडे यांना शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लक्ष्मी यांच्या डोक्यात तसेच अंगार तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या लक्ष्मी भांडे यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपीविरुध्द गुन्हा दि. 20.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, बेंबळी: अंकुश नवनाथ दुधभाते, रा. रुईभर, ता. उस्मानाबाद हे दि. 20.06.2020 रोजी 17.00 वा. सु. मौजे रुईभर येथील आपल्या शेतात पेरणी करण्याकरीता गेले होते. यावेळी नातेवाईक- विठ्ठल महादेव लांडगे, रा. ढोकी व अमित अनिल घोडके, रा. देवळाली, ता. उस्मानाबाद या दोघांनी अंकुश दुधभाते यांच्या शेतात येउन शेतातील हिस्सा देण्याच्या कारणावरुन अंकुश दुधभाते यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याने अंकुश यांचा डावा हात मोडला आहे. वडीलास होत असलेली मारहाण सोडवण्यास आलेला अजित दुधभाते यालाही नमूद दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या अंकुश दुधभाते यांच्या फिर्यादीवरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा दि. 20.06.2020 रोजी नोंदवला आहे.
                                                                                    

No comments