Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): रामराव जनार्दन वडजे, रा. जिल्हा रुग्णालय शासकीय निवासस्थान, उस्मानाबाद हे बाहेर गावी गेले असता त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 12.06.2020 ते दि. 15.06.2020 या कालावधीत तोडून घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम 15,000/-रु. व 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या रामराव वडजे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 15.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, कळंब: विलास लक्ष्मण खेतकर, रा. ढोकी नाका डीकसळ शिवार, ता. कळंब यांनी त्यांची हिरो होंडा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 9973 ही दि. 10.06.2020 रोजी 11.30 वा. सु. स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा, कळंब समोर लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या विलास खेतकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 15.06.2020 रोजी नोंदवला आहे.

जुगार अड्ड्यावर छापा.”
पोलीस ठाणे, लोहारा: 1)संजय राजपुत 2)शिवशंकर दंडगुले 3)अनिल दंडगुले 4)गोपाळ कोळी 5)गोपाळ दंडगुले 6)लिंबारी मिटकरी 7)आकाश मारेकर 8)मच्छींद्र पुरी 9)प्रकाश मिटकरी सर्व रा. तावशीगड, ता. लोहारा हे सर्व दि. 14.06.2020 रोजी मौजे तावशीगड शिवारातील शेतात तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 6,826/-रु. च्या मालासह पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द गुन्हा दि. 14.06.2020 रोजी नोंदवला आहे.

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाई.
पो.ठा. ढोकी: मच्छींद्र नवनाथ कांबळे, रा. तडवळा, ता. उस्मानाबाद हा दि. 14.06.2020 रोजी ढोकी ते तडवळा रस्त्यावरील ढोकवडा पुला जवळ विदेशी दारुची विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 180 मि.ली. च्या 47 बाटल्या (किं.अं. 7,050/-रु) कब्जात बाळगलेला असतांना स्थानिक गुन्हे शाखा, च्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द पो.ठा. ढोकी येथे गुन्हा दि. 14.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments