Header Ads

सासरच्या त्रासास कंटाळून सुनेची आत्महत्या


पोलीस ठाणे, उमरगा: हुंड्यात बाकी राहीलेले सोने माहेरहुन आणावेत याकरीता सुन- गायत्री योगेश सोनवणे, वय 20 वर्षे, यांना 1)योगेश धनाजी सोनवणे (पती) 2)धनाजी माणिकराव सोनवणे (सासरा) 3)प्रिया व सारीका (दोघी नणंद) सर्व रा. कवठा, ता. उमरगा यांनी लग्न झाल्यापासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. त्‍यांच्या या त्रासास कंटाळून दि. 05.06.2020 रोजी 11.00 वा. सु. मौजे कवठा येथे सुन- गायत्री सोनवणे यांनी स्वत:ला पेटवून घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या संजय कडाजी जाधव रा. तुरोरी, ता. उमरगा यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 08.06.2020 रोजी नोंदवला आहे.

वाळू (गौण खनिज) चोरी.
पोलीस ठाणे, कळंब: बंकट गणपत जावळे, दत्तात्रय श्रीराम तनपुरे, नेताजी बाबुराव कदम, तीघे रा. कळंब यांनी दि. 02.06.2020 रोजी 13.30 वा. सु. कळंब शहरा जवळील मांजरा नदी पात्रातील आपापल्या शेत जमीन व परिसरातील वाळू (गौण खनिज) 256 ब्रास वाळु अवैध उपसा- चोरी करुन विक्री केली आहे. अशा मजकुराच्या मंडळ अधिकारी, कळंब श्री. तुळशीराम मटके यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद तीघांविरुध्द गुन्हा दि. 08.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments