Header Ads

बँक खात्यातील रक्कम परस्पर ऑनलाईन पध्दतीने काढून फसवणूकपोलीस ठाणे, परंडा: एका अनोळखी मोबाईल क्रमांक धारकाने दि. 12.06.2020 रोजी जाकीर हुसेन हुकमोद्दीन मुल्ला, रा. जवळा (नि.), ता. परंडा यांच्या पे.टी.एम. खात्याद्वारे आय.सी.आय. बँक शाखा, परंडा येथील खात्यामधील 1,62,957/-रु. व एस.बी.आय. बँक खात्यामधील 74,999/-रु. अशी एकुण 2,37,956/-रु. रक्कम ऑनलाईन पध्दतीने परस्पर काढून फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या जाकीर हुसेन मुल्ला यांच्या फिर्यादीवरुन संबंधीत अनोळखी मोबाईल क्रमांक धारकाविरुध्द गुन्हा दि. 16.06.2020 रोजी नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तिघांना प्रत्येकी 200/- रु. दंड.
पो.ठा. उस्मानाबाद ग्रामीण: सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तीन व्यक्तींवर पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या पथकाने कारवाई करुन त्यांच्याकडून प्रत्येकी 200/-रु. दंड असा एकुण 600/- रु. दंड दि. 16.06.2020 रोजी वसूल केला आहे.


अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.
पो.ठा. लोहारा: शाहुराज विश्वनाथ सोनवणे, रा. नागुर, ता. लोहारा हा दि. 16.06.2020 रोजी भिमनगर, मौजे नागुर येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 800/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळल्याने त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.
पो.ठा. तुळजापूर: वैभव अशोक जाधव, रा. अवंतीनगर, सोलापून हा दि. 16.06.2020 रोजी तुळजापूर शहरात रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 13 सीआर 9398 ने दारुची अवैध वाहतुक करत असतांना पो.ठा. तुळजापूर च्या पथकास आढळला. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून विदेशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 5,280/-रु.) व दारुची वाहतुक करण्यास वापरलेली नमूद मो.सा. जप्त करुन गुन्हा नोंदवला आहे.

 “मोटार वाहन कायदा उल्लंघन: 292 कारवायांत 60,000 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.

उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी दि. 16/06/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुध्द 292 कारवाया केल्या. त्यातुन 60,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

No comments