Header Ads

लोखंडी बैलगाडी चोरी: चार दिवसात मुद्देमालासह आरोपी ताब्यात बेंबळी: लोखंडी  बैलगाडीची  चोरी करणाऱ्या तीन चोरट्याना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

जयलक्ष्मी साखर कारखान्याच्या आवारातील लोखंडी बैलगाडी व एक लोखंडी दरवाजा असा एकुण किं.अं. 73,000/- रु. चा माल अज्ञात चोरट्याने दि. 01.06.2020 ते 04.06.2020 कालावधीत चोरुन नेला होता. यावरुन पो.ठा. बेंबळी येथे गु.र.क्र. 72/2020 दाखल होता.

            सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी- 1)रणजीत सौदागर काळे, रा. पवारवाडी, ता. उस्मानाबाद 2) तानाजी बंकट माने रा. नितळी, ता. उस्मानाबाद 3) शिवा भिमराव भातलवंडे, रा. काजळा, ता. उस्मानाबाद या तीघांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरुन नेलेला वरील मुद्देमाल व चोरी करण्या करीता वापरलेले ट्रॅक्टर- ट्रेलर जप्त केला आहे. उर्वरीत तपासकामी आरोपींस पो.ठा. बेंबळी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

            ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि.  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि आण्णाराव खोडेवाड, पोहेकॉ- किशोर रोकडे, पोकॉ- पांडुरंग सावंत, दिपक लाव्हरेपाटील यांच्या पथकाने केली आहे.

No comments