Header Ads

मनाई आदेश झुगारुन ढाबा चालू ठेवला, गुन्हा दाखलमुरुम: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सींग, हॉटेल मधील ग्राहक सेवा इत्यादी विषयी अनेक मनाई आदेश जारी केले आहेत. या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन लाडाप्पा मारुती कालेकर, रा. शास्त्रीनगर, मुरुम, ता. उमरगा यांनी आपला ‘न्यु कालेकर ढाबा’ दि. 22.06.2020 रोजी 14.00 वा. सु. व्यवसायास चालू ठेउन ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता पर्यावरणपुरक व नष्ट न करता येतील अशा प्लेट्स, ग्लास इत्यादींचा वापर करत नसतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळले.यावरुन त्यांच्याविरुध्द पोहेकॉ- संदीपान कोळी यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा दि. 22.06.2020 रोजी नोंदवला आहे.

अपघात

येरमाळा: उस्मान हुजूर शेख, रा. भिवंडी, जि. ठाणे हे दि. 21.06.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे तेरखेडा येथील रस्त्याने ट्रक क्र. एम.एच. 04 केएफ 8786 हा चालवत जात होते. दरम्यान ट्रक क्र. के.ए. 32 ए 5079 च्या अज्ञात चालकाने उस्मान शेख यांच्या ट्रकला पाठीमागील उजव्या बाजूस धडक दिली. या अपघातात उस्मान शेख यांच्या ट्रकचे नुकसान झाले तर, ट्रक क्र. के.ए. 32 ए 5079 चा अज्ञात चालक स्वत: जखमी झाला आहे. अशा मजकुराच्या उस्मान शेख यांच्या फिर्यादीवरुन नमूद ट्रकच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 22.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments