Header Ads

प्राथमिक आरोग्य केंद्रात मद्यपीचा गोंधळ, गुन्हा दाखल
बेंबळी: बेंबळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या एका मद्यपीविरुद्ध बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. रोहीत राठोड हे दि. 22.06.2020 रोजी 21.15 वा. सु. मौजे बेंबळी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर होते. यावेळी अमर महादेव कांबळे, रा. बरमगांव, ता. उस्मानाबाद याने मद्यधुंद अवस्थेत तेथे येउन आरडा- ओरड करुन गोंधळ घातला. यावर डॉ. राठोड यांनी त्यास समजाउन बाहेर जाण्यास सांगीतले असता त्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या विरुध्द ॲट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या डॉ. राठोड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपी विरुध्द गुन्हा दि. 22.06.2020 रोजी पो.ठा. बेंबळी येथे भा.दं.वि. कलम- 294, 189, 504, 506 अन्वये नोंदवण्यात आला आहे.

No comments