Header Ads

दोन रस्ता अपघात, एक पुरुष मयत


पोलीस ठाणे, नळदुर्ग: रामचंद्र यादव मुसळे, रा. गंधोरा, ता. तुळजापूर हे दि. 09.06.2020 रोजी 19.30 वा. सु. ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 14 जीडी 6218 हा नळदुर्ग ते तुळजापूर चालवत जात होते. प्रवासा दरम्यान मौजे गंधोरा शिवारातील रस्त्यावर ट्रक क्र. केए 56- 4333 च्या अज्ञात चालकाने ट्रक निष्काळजीपणे, हयगईने चालवून रामचंद्र मुसळे यांच्या नमुद वाहनास समोरुन धडक दिली. या अपघातात रामचंद्र मुसळे हे गंभीर जखमी होउन मयत झाले आहेत. अशा मजकुराच्या ज्योतीबा यादव मुसळे (मयताचा भाऊ) रा. गंधोरा यांच्या फिर्यादीवरुन नमुद ट्रकच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 10.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, येरमाळा: अहेदी जुमा खान, रा. बच्चु खजीफे की बावउी मेदूसर, ता. बाडमेर, राज्य- राजस्थान याने दि. 10.06.2020 रोजी 06.00 वा. सु. मौजे चोराखळी शिवारात, राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील वळणावर ट्रक क्र. आर.जे. 19 जीसी 1186 हा निष्काळजीपणे चालवल्याने तो अनियंत्रीत होउन रस्त्याच्या खाली जाउन पलटला. या अपघातात खिमीसा सुमार खान, कुरबान ईदा खान, दोघे रा. बच्चु खजीफे की बावडी मेदूसर हे जखमी झाले. तर ट्रक मधील 42 बकरे मृत होउन अन्य बकऱ्यांना दुखापत झाली. यात बकरे व ट्रक असे एकुण 5,00,000/-रु. चे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या सुलेमान बच्चु खान यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दि. 10.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments