Header Ads

तीन गुन्ह्यांतील सहा वॉन्टेड आरोपी अटकेतउस्मानाबाद -  विविध तीन गुन्ह्यातील सहा वॉन्टेड आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

 पो.ठा. आनंदनगर गु.र.क्र. 151/2018 भा.दं.वि. कलम- 143, 149, 447 मधील पाहिजे आरोपी- समीरउद्दीन काझी उर्फ मुझम्मील हा 2 वर्षापासून पोलीसांना पाहिजे (Wanted) होता. तर, पो.ठा. वाशी गु.र.क्र. 120/2020 भा.दं.वि. कलम- 307 या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- कृष्णा आण्णासाहेब देशमुख, दादासाहेब उध्दव हुंबे व एक अल्पवयीन युवक (विधी संघर्ष ग्रस्त) यांसह तर, पो.ठा. आनंदनगर गु.र.क्र. 119/2020 भा.दं.वि. कलम- 379 मधील पाहिजे आरोपी- जिशान रहिम शेख, अरबाज जहांगीर शेख दोघे रा. शालीमार हॉटेल मागे, उस्मानाबाद अशा सहा आरोपींस स्थागुशा च्या पथकाने दि. 04.06.2020 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकानांहुन ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोनि  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष खांडेकर, पोउपनि पांडुरंग माने, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, किसन जगताप, प्रमोद थोरात, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अमोल कावरे, संतोष गव्हाणे, पोकॉ- अविनाश मारलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.

No comments