Header Ads

दोन रस्ते अपघातात एक महिला मयत
पोलीस ठाणे, मुरुम: सुनिता तानाजी कोने, वय 45 वर्षे, रा. सांजा रोड, उस्मानाबाद या नेताजी भरत कोळी, रा. व्हंताळ, ता. उमरगा हे दोघे स्वयंपाकासाठी महिला कामगार शोधन्यासाठी दि. 08.06.2020 रोजी मौजे कडदोरा येथून रस्त्याने पायी चालत मौजे समुद्राळ येथे जात होते. यावेळी वसीम महेबुब पटेल, रा. दाबका, ता. उमरगा याने ॲक्टीव्हा स्कुटर क्र. एम.एच. 25 एक्यु 7017 ही निष्काळजीपणे चालवून पायी जाणाऱ्या सुनिता तानाजी कोने यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात सुनिता कोने गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अशा मजकुराच्या नेताजी भरत कोळी यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद स्कुटर चालकाविरुध्द भा.दं.वि. कलम- 279, 304 (अ), सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 14.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: निलेश शिवाजी राठोड वय 22 वर्षे, रा. वसंतनगर, नळदुर्ग हा दि. 13.06.2020 रोजी 11.30 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर, धनगरवाडी शिवारात मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एजी 8070 ही चालवत जात होता. दरम्यान ट्रक क्र. एच.आर. 38 एबी 8714 चा चालक- विनोद गोपाल गुज्जर, रा. शिखर, राजस्थान याने ट्रक निष्काळजीपणे, हयगईने चालवून निलेश राठोड चालवत असलेल्या मो.सा. ला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात निलेश राठोड हा गंभीर जखमी झाला आहे. अशा मजकुराच्या शिवाजी रामदास राठाडे, रा. वसंतनगर यांच्या फिर्यादीवरुन नमुद ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दि. 13.06.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.
पोलीस ठाणे, ढोकी: मौजे ढोकी, ता. उस्मानाबाद येथील ‘तेरणा बियर बार’ च्या शटरचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 23.04.2020 रोजी 21.00 ते दि. 24.04.2020 रोजी 12.30 वा. चे दरम्यान तोडून आत मधील वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारुच्या 8,338 बाटल्या व बियरच्या 195 बाटल्या असा एकुण किं.अं. 10,44,773/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या ‘तेरणा बियर बार’ चालक- श्रीहरी वसंत माळी, रा. ढोकी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 13.06.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): सखुबाई महादेव खरे, रा. सारोळा, ता. उस्मानाबाद यांनी दि. 10.06.2020 रोजी सकाळी 10.00 वा. आपल्या राहत्या घरी वट पोर्णीमा सना निमीत्त सोन्याचे दागिने कपाटा बाहेर काढले होते. सखुबाई यांनी कामाच्या गडबडीत 55 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेला तो डबा कपाटात न ठेवता धान्याच्या कोठीवर ठेवला होता. दुसऱ्या दिवशी दुपार नंतर त्यांना दागिन्यांचा डबा ठेवल्या जागेवर आढळला नाही.  यावरुन तो दागिन्यांचा डबा अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सखुबाई यांचा मुलगा- विश्वनाथ महादेव खरे यांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 380 अन्वये गुन्हा दि. 14.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments