Header Ads

दोन महिलांविरुद्ध चोरीची तक्रारउस्मानाबाद -  दैवशाला प्रल्हाद कडेकर, रा. लासोणा, ता. उस्मानाबाद त्यांची मुलगी- उर्मीला कुंभार या दोघी दि. 25.06.2020 रोजी 12.00 वा. सु. काळा मारुती चौक, उस्मानाबाद येथील ‘भारत ज्वेलर्स’ येथे कान टोचण्यास गेल्या होत्या. यावेळी उर्मीला कुंभार यांनी पर्स बाकावर ठेवली असतांना त्यांच्या नकळत सिमा संतोष पवार, रा. बीजनवाडी, ता. तुळजापूर व सरुजा राजु भोसले, रा. साठेनगर, उस्मानाबाद या दोघींनी पर्स उघडून पर्समधील रोख 3,500/-रु. चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या दैवशाला कडेकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघींविरुध्द गुन्हा दि. 25.06.2020 रोजी नोंदवला आहे.मोटार वाहन कायदा उल्लंघन: 195 कारवायांत 41,800 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त
उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी दि. 24/06/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुध्द 195 कारवाया केल्या. त्यातुन 41,800 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.


No comments