Header Ads

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलाचे अपहरण


पोलीस ठाणे, आनंदनगर: सौरव प्रकाश चव्हाण, वय 16 वर्षे, रा. एमआयडीसी, उस्मानाबाद यास दि. 01.06.2020 रोजी 18.00 वा. सु. त्याच्या आईने दुध पिशवी आणण्यास दुकानात पाठविले होते. परंतू तो घरी परत आला नाही. कुटूंबीयांनी नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला असता त्याबाबात कोणतीही माहिती मिळाली नाही. यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याचे अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या वडील- प्रकाश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 02.06.2020 रोजी नोंदवला आहे.


मारहाण.”
पोलीस ठाणे, तुळजापूर: मनोज लांडगे, कुमार लांडगे, पांडुरंग लांडगे, उमेश लांडगे, लक्ष्मण लांडगे, गेनदेव लांडगे, चांगदेव लांडगे सर्व रा. बिजनवाडी, ता. तुळजापूर यांनी दि. 31.05.2020 रोजी 18.30 वा. सु. बिजनवाडी शेत गट क्र. 150 मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन भाऊबंद- अनंत किसन लांडगे व विकास लांडगे यांना शिवीगाळ करुन, लोखंडी गजाने, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच अनंत लांडगे यांच्या शेतातील पीव्हीसी पाईप फोडून आर्थिक नुकसान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनंत लांडगे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 02.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: दिनकर शंकर मगे रा. कोळसुर (ग.), ता. उमरगा हे दि. 01.06.2020 रोजी 21.00 वा. सु. गावातीच मारुती मंदर समोरून घरी जात होते. यावेळी गावातीलच- निंगाप्पा गुंडप्पा माळी, मल्लाप्पा माळी या दोघा भावांनी शेतबांधाच्या कारणावरुन दिनकर मगे यांना शिवीगाळ करुन, काठीने मारहाण केली. यात दिनकर मगे यांचा उजवा हाताचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या दिनकर मगे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद दोघांविरुध्द गुन्हा दि. 02.06.2020 रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): शंकर अभिमान शितोळे, रा. टीपीएस रोड, उस्मानाबाद हे दि. 29.05.2020 रोजी 22.30 वा. सु. स्वत:च्या राहत्या घरा समोर होते. यावेळी कॉलनीतील- अक्षय मुंडे, धनंजय मुंडे, प्रितम मुंडे, अमोल पवार, रामभाऊ मुंडे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन शंकर शितोळे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, फायटर- दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शंकर शितोळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 03.06.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, बेंबळी: तुकाराम महादेव साळुंके रा. समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद यांनी त्यांचे शेतशेजारी अविनाश जोशी यांच्या समुद्रवाणी येथील शेतात बांधलेल्या दोन बैल व तीन गायी पैकी दोन बैल किं.अं. 44,000/-रु. चे दि. 27.05.2020 रोजी मध्य रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. अशा मजकुराच्या तुकाराराम साळुंके यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.06.2020 रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, आनंदनगर: जावेद गफुर शेख रा. गालीबनगर, उस्मानाबाद यांनी त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीएफ 0185 ही दि. 31.05.2020 रोजी 21.00 ते 23.00 वा. चे दरम्यान स्वत: च्या राहत्या घरा समोर लावली होती. दरम्यान ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या जावेद शेख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.06.2020 रोजी नोंदवला आहे.No comments