Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे पाच गुन्हे दाखलपोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): दादा पंजा पवार व अन्य 13 व्यक्ती सर्व रा. पापनाश नगर, पारधी पिढी, उस्मानाबाद यांचा परिसरातीलच सुनिल रामा काळे व अन्य 8 व्यक्ती यांच्यात पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 19.06.2020 रोजी 19.00 वा. सु. पापनाश नगर, पारधी पिढी, उस्मानाबाद येथे वाद झाला.
या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड, विटा, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच दोन्ही गटांतील सदस्यांनी एकमेकांच्या घरावर दगड मारले व घरातील साहित्यांची तोडफोड करुन आर्थिक नुकसान केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे दि. 20.06.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, तुळजापूर: लक्ष्मण लाला चंदनशिवे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हे दि. 19.06.2020 रोजी 11.45 वा. सु. गावातील आपल्या शेतात जात होते. यावेळी भाऊबंद- समाधान जनार्धन चंदनशिवे, आनंद जनार्धन चंदनशिवे या दोघांनी सामाईक भिंतीचा वाद उकरुन काढून लक्ष्मण चंदनशिवे यांना शिवीगाळ करुन, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या लक्ष्मण चंदनशिवे यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 19.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, शिराढोण: सुनंदा गणपती माळी, रा. नागझरवाडी, ता. कळंब यांनी पोटगी मिळण्यासाठी पती- गणपती माळी यांच्याविरुध्द न्यायालयात खटला दाखल केला आहे. यावर चिडून जाउन मुलगा- भगीरथ याने दि. 18.06.2020 रोजी 17.30 वा. सु. आई- सुनंदा हीस मौजे नागझरवाडी येथे शिवीगाळ करुन डोक्यात काठी मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुनंदा माळी यांच्या प्रथम खबरेवरुन भगीरथ माळी याच्याविरुध्द गुन्हा दि. 19.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: लक्ष्मण भगवान बोराडे, रा. दरेवाडी, ता. भूम यांनी दि. 19.06.2020 रोजी 08.30 वा. सु. भाऊबंद- कैलास तात्याबा बोराडे यांना रहदारीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लक्ष्मण यांनी कैलास बोराडे यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कैलास बोराडे यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपीविरुध्द गुन्हा दि. 19.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, भुम: जालिंदर शामराव शेळके, रा. वाकवड, ता. भुम हे दि. 19.06.2020 रोजी रात्री 10.00 वा. आपल्या शेतात होते.  यावेळी गावातीलच मदने परीवारातील सदस्य गंगाराम, नवनाथ, लक्ष्मण, गोरख, तात्याबा, भीमा, सचिन यांनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करुन, दगडाने मारून जखमी केले. अशा मजकुराच्या जालिंदर शेळके यांच्या तक्रारीवरुन वरील 7 व्यक्तींविरुध्द गुन्हा दि. 20.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments