Header Ads

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविनाऱ्यावर गुन्हा दाखल


 शिराढोण: बाळासाहेब शिवशरण शिंदे, रा. लोहटा (पुर्व), ता. कळंब हा मद्यधुंद अवस्थेत, भरधाव वेगाने स्विफ्ट कार क्र. एम.एच. 12 केए 6954 चालवत असतांना दि. 09.06.2020 रोजी 20.00 वा. सु. मौजे ताडगांव पोलीस चेक पोस्ट येथे पोलीस पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 279 सह, मो.वा.का. कलम- 184, 185 अन्व्ये गुन्हा दि. 10.06.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


मारहाण.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): रामसाहेब अंबादास शिंगाडे व अन्य 7 व्यक्ती सर्व रा. बौध्दनगर, उस्मानाबाद यांचा  कॉलनीतीलच अजय तुळशीदास बनसोडे व अन्य 3 व्यक्तींशी दि.08.06.2020 व 09.06.2020 कालावधीत अजिंठानगर, उस्मानाबाद येथे पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या नबाबावरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे दि. 09.06.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, परंडा: महादेव गौतम गटकुळ रा. खानापुर, ता. परंडा हे दि. 06.06.2020 रोजी 11.30 वा. सु. आपल्या राहत्या घरा समोर थांबले होते. यावेळी गावातीलच नातेवाईक- बाबु भोरे, महादेव भोरे, शंकर भोरे, दैवशाला भोरे, सविता गटकुळ, कमल थिटे व मौजे कुंभेजा, ता. परंडा येथील दादा मिसाळ या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून महादेव गटकूळ यांना शिवीगाळ करुन, दगड- काठीने मारहाण केली. भावास होत असलेली मारहाण पाहुन भावास सोडवण्यास आलेल्या शंकर गटकुळ यांनाही नमुद आरोपींनी माहराण करुन जखमी केले. यात शंकर गटकुळ हे बेशुध्द झाल्याने त्यांना उपचारकामी दवाखान्यात दाखल केले. अशा मजकुराच्या महादेव गटकुळ यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 09.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments