Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 


नळदुर्ग: यशवंत रेवाप्पा राठोड, स्वप्नील राठोड दोघे रा. आलियाबाद तांडा, ता. तुळजापूर यांनी दि. 05.06.2020 रोजी 12.00 वा. सु. मौजे नळदुर्ग येथील बी.के. हॉल समोरील रोडवर पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून राहुल शंकर चव्हाण, रा. पाटील तांडा, खुदावाडी, ता. तुळजापूर यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या राहुल चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन नमुद दोघांविरुध्द गुन्हा दि. 07.06.2020 रोजी नोंदवला आहे.

 कळंब: विकास ज्ञारदेव गंभीरे, रा. ईटकुर, ता. कळंब हे त्यांचे वडील- ज्ञानदेव गंभीरे व आई यांसह दि. 07.06.2020 रोजी 15.00 वा. सु. मौजे ईटकुर येथील आपल्या शेतात होते. यावेळी भाऊबंद- सुसेन साहेबराव गंभीरे, शिला गंभीरे, मयुर गंभीरे, गणेश बोराडे यांनी कुपनलीका घेण्याच्या कारणावरुन विकास गंभीरे व ज्ञानदेव गंभीरे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच विकाय गंभीरे यांच्या आईसही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या विकास गंभीर यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.06.2020 रोजी नोंदवला आहे.
                                                                                    

No comments