Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल


पोलीस ठाणे, आनंदनगर: प्रशांत गुरप्पा कांबळे, रा. पोस्ट कॉलनी, उस्मानाबाद यांनी त्यांची होंडा ड्रीम युगा मोटरसायकल क्र. एम.एच. 13 बीडब्ल्यु 7516 ही दि. 25.06.2020 रोजी मध्य रात्री आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. सकाळी त्यांना ती लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या प्रशांत कांबळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 29.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, वाशी: मौजे नांदगाव, ता. वाशी येथील जिल्हा परीषद शाळेच्या इ- लर्निंग खोलीचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 27.06.2020 ते 29.06.2020 या कालावधीत तोडून आतील डेल कंपनीचा सीपीयु, कि- बोर्ड, माउस एकुण किं.अं. 6,000/-रु चा चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या शिक्षक- हनुमंत क्षिरसागर यांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 30.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments