Header Ads

निष्काळजीपणे वाहन चालवल्याने पुरुष मयत


पोलीस ठाणे, ढोकी: विनोद गोकुळ काळे व नारायण किसनराव समुद्रे वय 54 वर्षे, दोघे रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे दोघे दि. 20.04.2020 रोजी 20.15 वा. सु. स्विफ्ट कार क्र. एम.एच. 25 यु 0090 ने मौजे वाकरवाडी- ढोकी असा प्रवास करत होते. दरम्यान विनोद काळे यांनी कार निष्काळजीपणे चालवल्याने अनियंत्रीत होउन रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात जाउन आदळली. या अपघातात नारायण समुद्रे हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या अमोल अनंतराव समुद्रे रा. ढोकी यांच्या फिर्यादीवरुन विनोद काळे यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 304(अ), 279 अन्वये गुन्हा दि. 01.06.2020 रोजी नोंदवला आहे.

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाई.
1) जाफर हमीद सय्यद रा. मसला (खु.), ता. तुळजापूर हा दि. 01.06.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 15 ली. गावठी दारु (किं.अं. 1,550/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. तामलवाडी च्या पथकास आढळल्याने पो.ठा. तामलवाडी येथे गुन्हा नोंदवला आहे.
2) विठ्ठल हरीभाऊ समुद्रे रा. पुनर्वसन सावरगाव, ता. कळंब हे दि. 02.06.2020 रोजी आपल्या राहत्या घरी अवैध मद्य विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 15 खोकी विदेशी दारु अशा 180 मि.ली. च्या एकुण 720 बाटल्या (एकुण किंमत- 1,09,440/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळला.
यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. कळंब येथे गुन्हा नोंदवला आहे. 

जुगार अड्यावर 2 छापे.”
पोलीस ठाणे, कळंब: समीर निजाम पठाण उर्फ रईस रा. डिकसळ, ता. कळंब हा दि. 02.06.2020 रोजी कळंब बस स्थानका समोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या उद्देशाने जुगाराच्या साहीत्यासह एकुण रक्कम 1,050/-रु. सह पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळला. तर दुसऱ्या घटनेत याच दिवशी रफिक करीम पठाण, पांडुरंग चिंचकर दोघे रा. डिकसळ हे शिवाजी चौक, कळंब येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या उद्देशाने जुगाराच्या साहीत्यासह एकुण रक्कम 2,400/-रु. सह स्था.गु.शा. च्या पथकास आढळला. यावरुन वरील व्यक्तींविरुध्द पो.ठा. कळंब येथे 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


No comments