Header Ads

विज चोरीची यंत्रणा उभारली, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, उमरगा: 1)अनंत होनाळकर 2)दत्तु शिवरकर 3)बळी नरगाळे  4)अशोक जाधव 5)महेश जाधव 6)श्रीकांत जाधव 7)बालाजी जाधव 8)राम मुळे 9)अशोक मुळे 10)आण्णाप्पा मुळे सर्व रा. हिप्परगा (रवा), ता. लोहारा या सर्वांना विज वाहिनीतून विज चोरी करण्याच्या उद्देशाने 11)हरीभाऊ गवळी यांच्या मार्फत मौजे हिप्परगा (रवा) शिवारात रोहित्र, खांब इत्यादी यंत्रणा दि. 09.06.2020 पुर्वी उभारली आहे.
अशा मजकुराच्या महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे लोहारा कार्यालयातील कर्मचारी- राम शिवाजी दिक्षीत यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील 11 व्यक्तींविरुध्द भारतीय विद्युत कायदा कलम- 138 (1) (ए) अन्वये गुन्हा दि. 11.06.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): संदीप सयाजी जाधवर, रा. भानुनगर, उस्मानाबाद यांनी त्यांची एक्स प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 5257 ही दि. 08.06.2020 रोजी 13.00 वा. च्या सुमारास उस्मानाबाद येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कुंपनाच्या बाजूस लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या संदीप जाधवर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 11.06.2020 रोजी नोंदवला  आहे.

No comments