Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखलपरंडा: उर्मिला लक्ष्मण बोराडे, रा. दरेवाडी (सावरगाव), ता. भुम यांसह त्यांचे पती- लक्षमण बोराडे यांना दि. 19.06.2020 रोजी 08.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर भाऊबंद- सुरेश तात्या बोराडे, तात्या बोराडे, शांताबाई बोराडे, कैलास बोराडे या सर्वांनी रहदारीच्या व पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन उर्मिला व लक्ष्मण बोराडे या दोघा पती- पत्नीला शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कैलास बोराडे याने अर्मिला बोराडे यांच्या जबड्यावर दगड मारल्याने त्यांच्या जबड्याचे हाड फॅक्चर झाले आहे. अशा मजकुराच्या उर्मिला बोराडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.06.2020 रोजी नोंदवला आहे.


 बेंबळी: गोजरबाई व्यंकट जाधव, रा. तोरंबा, ता. उस्मानाबाद या दि. 20.06.2020 रोजी 15.30 वा. सु. मौजे तोरंबा येथील आपल्या मुलीच्या शेतात पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर घेउन गेले होते. यावेळी गावातीलच नातेवाईक- दत्तात्रय चंद्रास पाटील, चंद्राहास पाटील, ज्योती पाटील या तीघांनी पेरणी करण्यास अडवणूक करुन गोजरबाई जाधव यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात गोजरबाई जाधव यांच्या तोंडावर बुक्की मारल्याने दात पडून जखमी झाल्या. अशा मजकुराच्या गोजरबाई जाधव यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.06.2020 रोजी नोंदवला आहे.


 नळदुर्ग: सुशिल सतिश गवळी, रा. वडगाव (देव), ता. तुळजापूर यांसह त्यांची आई- उषा गवळी या दोघांना दि. 21.06.2020 रोजी 21.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर गावातीलच- पापा सगट, लक्ष्मी सगट, ओंकार सगट या तीघांनी जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन सुशिल गवळी व त्यांच्या आईस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळईने, दगड- काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुशिल गवळी यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.06.2020 रोजी नोंदवला आहे.


मुरुम: योगेश राजशेखर बरबडे, रा. येणेगूर, ता. उमरगा हे दि. 19.06.2020 रोजी मौजे येणेगूर शिवारातील आपल्या शेतात पेरणी करत होते. यावेळी गावकरी- चंद्रकांत बिराजदार, सुनिल चंद्रकांत बिराजदार या दोघे पिता- पुत्रांनी पेरणीच्या कारणावरुन योगेश बरबडे यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच सुनिल बिराजदार यांनी योगेश बरबडे यांच्या उजव्या हातावर विळ्याने वार करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या योगेश बरबडे यांच्या फिर्यादीवरुन नमूद दोघा पिता- पुत्रांविरुध्द गुन्हा दि. 23.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments