Header Ads

तीन रस्ते अपघात, महिलेचा मृत्यूपोलीस ठाणे, मुरुम: सुभद्राबाई दशरथ वाकळे, वय 64 वर्षे, रा. दस्तापुर, ता. लोहारा या दि. 21.06.2020 रोजी 19.00 वा. सु. मौजे दस्तापुर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 हा पायी चालत ओलांडत होत्या. यावेळी विक्रम दामाजी राठोड, रा. नरखुरी तांडा, जळकोट, ता. तुळजापूर यांनी होंडा एसपी मोटारसायकल निष्काळजीपणे, हयगईने चालवून सुभद्राबाई वाकळे यांना जोराची धडक दिली. या अपघातात सुभद्राबाई वाकळे या गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाल्या. अशा मजकुराच्या जगन वाकळे (मयताचा नातू) यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद मोटारसायकल चालकाविरुध्द गुन्हा दि. 26.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तामलवाडी: अनिल महादेव जाधव, वय 18 वर्षे, रा. देवकुरळी, ता. तुळजापूर हा दि. 31.03.2020 रोजी दुपारी 12.15 वा. सु. मौजे देवकुरळी येथील आपल्या शेतात होता. यावेळी विनायक आण्णासाहेब धनके, रा. पिंपळा (खु.), ता. तुळजापूर याने विनानंबरचा ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवून अनिल जाधव यास धडकावून गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या कौशल्या महादेव जाधव यांच्या फिर्यादीवरुन नमूद ट्रॅक्टर चालकावरुध्द गुन्हा दि. 27.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: दिगंबर दिनकर साळुंखे, वय 25  वर्षे, रा. कलदेव लिंबाळा, ता. उमरगा हे दि. 15.06.2020 रोजी 20.30 वा. सु. मौजे कलदेव लिंबाळा येथील समुद्राळ- सालेगाव रस्त्याने मो.सा. क्र. डी.डी. 03- 3475 ही चालवत जात होते. दरम्यान गावातीलच पांडुरंग कारभारी यांनी ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएल 8941 हा निष्काळजीपणे, विरुध्द दिशेने चालवून दिगंबर साळुंखे यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या दिगंबर साळुंखे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दि. 27.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments