Header Ads

उस्मानाबादेत सुशीलादेवी पतसंस्थेकडून ठेवीदाराची फसवणूक ; गुन्हा दाखलउस्मानाबाद : उस्मानाबादेत सुशीलादेवी पतसंस्थेकडून ठेवीदाराची फसवणूक झाली असून याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये  पतसंस्थेचे अध्यक्ष बालाजी साळुंके यांच्यसह संचालकाविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.


रणजित लिंबराज कांबळे, रा. संभाजी नगर, उस्मानाबाद यांसह त्यांचे वडील व नातेवाईक अशा सर्वांनी सन- 2016-17 या काळात एकुण 62,00,000/-रु. ची मुदत ठेव सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्था, उस्मानाबाद येथे दसादशे 14.40 दराने ठेवली होती. ठेवीची मुदत संपल्यानंतरही पतसंस्थेने त्यांना मुळ रक्कम- व्याज परत न करता त्यांची फसवणुक केली . अशा मजकुराच्या रणजित कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळातील सदस्य 1)बालाजी साळुंके 2)उस्मान निचलकर (उपाध्यक्ष) 3)गोविंद चव्हाण 4)सय्यद समियोद्दीन मशायक 5)सर्वोत्तम द्वारकानाथ कटके 6)सिध्दार्थ बनसोडे 7)वैशाली देशमुख 8)सरोजा चव्हाण 9)रुशिकेश हंटाचे 10)श्रीकांत तेरकर 11)मिलिंद पेठे सर्व रा. उस्मानाबाद यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 420, 406, 34, सह महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दि. 25.06.2020 रोजी नोंदवला आहे.

3 comments

AMBADAS V GORE said...

एका पतसंस्थेच्या कारवाई मुळे लोकांचा पतसंस्थेवरचा विश्वास उडेल.
परिणाम सर्व पतसंस्थांना आर्थिक गृहण लागण्याची शक्यता आहे.
तेव्हा प्रत्येक पतसंस्था व संचालक मंडळ यांनी अशी फसवणूक करते वेळी दहा वेळा विचार करावा.

Jivan Dolare said...

पैसे गेले कुठे ह्यांना सोडू नका

आसे झाले तर पत संसते वर चा विश्वास उठेल

Unknown said...

फसवणूक झाली काय