Header Ads

दोन अपघात, 2 तरुण मयत
पोलीस ठाणे, उमरगा: संतोष संभाजी भोसले, रा. कुंभारपट्टी, उमरगा हे दि. 04.06.2020 रोजी 21.00 वा. सु. उमरगा बस स्थानका समोरील रस्त्याने पायी चालत जात होते. दरम्यान चौरस्ता कडून येत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 4952 चा चालक- ईस्माईल ताजोद्दीन बलसुरे, रा. उमरगा याने मो.सा. निष्काळजीपणे, हयगईने चालवून संतोष भोसले यांना पाठामागून जोराची धडक दिली. या अपघातात संतोष भोसले हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या शिल्पा भोसले (मयताच्या पत्नी) यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद मो.सा. चालकाविरुध्द भा.दं.वि. कलम- 279, 304 (अ), सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 20.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: शिवाजी भिमराव चाबुकस्वार, विमल शिवाजी चाबुकस्वार, दत्ता यिावाजी चाबुकस्वार, गणेश शिवाजी चाबुकस्वार सर्व रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यांनी आपल्या शेतातील भुईमुग पिकाच्या तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाह सोडला होता. त्या तारेच्या कुंपनास गावकरी- पवन पोतदार, वय 23 वर्षे, यांचा दि. 18.06.2020 रोजी 10.30 वा. सु. पाय लागल्याने त्यांना विजेचा धक्का बसून ते मयत झाले. त्यांच्या मृत्युस नमूद चौघे व्यक्ती जबाबदार आहेत. अशा मजकुराच्या शिवाजी देवीदास पोतदार (मयताचे पिता) यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 304, 34 अन्वये गुन्हा दि. 20.06.2020 रोजी दाखल करण्यात आला आहे.

No comments