Header Ads

गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बाळगली, गुन्हा दाखल परंडा: उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भुम यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधार दि. 03.06.2020 रोजी 22.15 वा. सु. कसाब गल्ली, दर्गा रोड, परंडा येथील समद कुरेशी यांच्या मालकिच्या असलेल्या विटांच्या कुंपनात छापा मारला. यावेळी पोलीसांना तेथे दोन जर्सी गाई, व तीन वासरे (एकुण किं.अं. 24,000/-रु.) अवैध कत्तल करण्याच्या हेतूने आणली असल्याचे व त्या प्राण्यांना पुरेशा सुविधा न पुरवीता निर्दयीपणे बांधून ठेवल्याचे आढळले.

यावरुन पोकॉ- ब्रम्हदेव तरंगे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शहानवाज ख्वाजा कुरेशी, समद सत्तार कुरेशी, दोघे रा. कुऱ्हाड गल्ली, परंडा यांच्या विरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व पशु क्रुरता अधिनियम अंतर्गत गुन्हा दि. 04.06.2020 रोजी नोंदवला आहे.

“रस्ता अपघात.”

 उमरगा: मुस्तीफा आयुब कुरेशी रा. शिवपुरी रोड, उमरगा व त्यांचे काका असे दोघे दि. 01.06.2020 रोजी 15.30 वा. सु. उमरगा येथील राजधानी पेट्रोल पंप समोर स्कुटर क्र. एम.एच. 25 एक्यु 2917 ने जात होते. यावेळी कार क्र. एम.एच. 02 एफई 3710 च्या अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे, हयगईने चालवून मुस्तीफा कुरेशी चालवत असलेल्या नमुद स्कुटरला धडक दिली. या अपघातात मुस्तीफा कुरेशी हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मुस्तीफा कुरेशी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद कारच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 03.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments