Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल

चोरी.


पोलीस ठाणे, शिराढोण: कल्याण गंपु पवार रा. करंजकल्ला, ता. कळंब यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 20 बीसी 9030 ही दि. 18.06.2020 रोजी 08.00 ते 23.00 वा. चे दरम्यान गावातीलच- सुरेश पाटील यांच्या शेतात लावलेली व गावकरी- अरुण अच्युत पवार यांची त्यांच्या घरा समोर लावलेली हिरो होंडा पॅशन प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एस 9761 ही अशा दोन्ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या कल्याण पवार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 22.06.2020 रोजी नोंदवला आहे.


मारहाण.
पोलीस ठाणे, उमरगा: तानाजी विठ्ठल फुगटे, रा. माडज, ता. उमरगा हे दि. 20.06.2020 रोजी 05.00 वा. सु. आपल्या शेतात होते. यावेळी भाऊबंद- नागोराव फुगटे, प्रेमनाथ फुगटे, प्रियंका फुगटे, राऊ फुगटे यांनी तानाजी फुगटे यांच्या शेतात जाउन तुला पेरणीसाठी रस्ता देणार नाही. असे धमकावून तानाजी यांना शिवीगाळ करुन, कुळवाच्या रुमन्याने, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या तानाजी फुगटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा‍ दि. 21.06.2020 रोजी नोंदवला आहे.

एका व्यक्तीस 700/- रु. दंडासह 04 दिवस कारावास.
पोलीस ठाणे, तुळजापूर: पो.ठा. तुळजापू गु.र.क्र. 192/2020 भा.दं.वि. कलम 283 मधील आरोपी- प्रकाश विनायक पारवे, रा. बसवंतवाडी यास रहदारीस अडथळा होइल अशा धोकादायक स्थितीत सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे केल्या प्रकरणी मा. प्रथम वर्ग न्यायालय, तुळजापूर यांनी दोषी ठरवून  700/- रु. दंडासह चार दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाई.
पो.ठा. नळदुर्ग: गंगाधर शिवाजी कनकधर, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर हा दि. 21.06.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 1,200/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. नळदुर्ग च्या पथकास आढळला.

No comments