Header Ads

आंबी : चार भावांनी मिळून केला बहिणीचा खूनआंबी: न्यायालयात सुरु असलेले प्रकरण  माघार घेण्यास नकार दिल्याने चार भावांनी मिळून बहिणीचा खून केल्याची घटना मौजे रोहकल येथे घडली. याप्रकरणी आंबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनिता निवंता‍ शिंदे उर्फ लाकडी, वय 45 वर्षे, रा. पारधी पिढी, मौजे रोहकल, ता. परंडा यांचे भाऊ- बापूराव, बाळराजा, समाधान, सुदीन हे  त्यांच्या घरा शेजारीच राहतात. अनिता शिंदे यांचे पती निवांत बिरक्या शिंदे यांचे वरील चौघा शालकांनी सन- 2016 साली अपहरण केले होते. त्यावरुन अनिता शिंदे यांनी वर नमूद आपल्या चौघा भावांविरुध्द पो.ठा. आंबी येथे प्रथम खबर दिली होती. हा अपहरण खटला सध्या भूम न्यायालयात सुनावणीस आहे. बहीण- अनिता हिने न्यायालयात सुनावनी दरम्यान माघार घ्यावी या करीता वरील चौघे भाऊ तीच्यावर वारंवर दबाव टाकत होते. त्यांच्या या दडपणास बहीण- अनिता हिने कधीही दाद दिली नाही. याचा राग मनात धरुन दि. 21.06.2020 रोजी सकाळी 09.00 वा. सु. वरील चौघा भावांनी बहीण- अनिता शिंदे हिस उचलून आपल्या दारा समोर नेउन जमीनीवर ठेउन मारहाण करुन तलवारीने गळा कापून खुन केला आहे. अशा मजकुराच्या मयताचे पती- निवांता शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन वरील चौघा भावांविरुध्द भा.दं.वि. कलम- 302, 452, 34, सह भारतीय हत्यार कायदा कलम- 4,25 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments