Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखलनळदुर्ग: लक्ष्मण मारुती येंडगे रा. येवती, ता. तुळजापूर हे भाऊबंद- गणेश येंडगे यांच्या शेतातून पाईप लाईन नेत असल्याच्या व पुर्वीच्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 23.05.2020 रोजी 20.00 वा. सु. मौजे येवती येथे गणेश येंडगे यांच्यासह उमेश येंडगे, महेश येंडगे, तुकाराम येंडगे या सर्वांनी लक्ष्मण येंडगे यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या लक्ष्मण येंडगे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 05.06.2020 रोजी नोंदवला आहे.

उस्मानाबाद : शिवराज वैजनाथ धनकेकर रा. शिवाजी नगर, ता. परळी, जि. बीड हे दि. 02.06.2020 रोजी 12.30 वा. सु. सांजा रोड, उस्मानाबाद येथील त्यांच्या बेकरी शॉप समोर होते. यावेळी नातेवाईक- प्रसन्न कथले, रा. बँक कॉलनी, उस्मानाबाद, पप्पु बिडवे व अन्य दोन स्त्रीया तीघे रा. बामणी, ता. उस्मानाबाद या सर्वांनी शिवाराज धनकेकर यांनी बेकरीच्या भुखंडाच्या वादावरुन शिवराज धनकेकर यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने, स्टीलच्या बादलीने मारहाण करुन जखमी केले. तसेच मारहाण सोडवण्यास आलेल्या शिवराज यांच्या बहीण व भाची यांना देखील नमुद व्यक्तींनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिवराज धनकेकर यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 05.06.2020 रोजी नोंदवला आहे.

 तुळजापूर: परमेश्वर सिताराम राठोड रा. अपसिंगा, ता. तुळजापूर हे दि. 01.06.2020 रोजी मध्य रात्री आपल्या शेतात पिकास पाणी देत होते. यावेळी गावातीलच- दत्ता क्षिरसागर, हणुमंत क्षिरसागर, उत्तरेश्वर क्षिरसागर, मालू क्षिरसागर यांनी परमेश्वर राठोड यांच्या विहीरीतील पाणबुडी पंपाची नळी कापून पंप विहीरी बाहेर काढला. यावर परमेश्वर राठोड तेथे आले असता आरोपींनी त्यांचे तोंड दाबून खाली पाडून काठीने मारहाण केली व खिशातील 10,000/- रु. रक्कम बळजबरीने काढून व पानबूडी पंप घेउन निघून गेले. अशा मजकुराच्या परमेश्वर राठोड यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments