Header Ads

सुनेचा छळ, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, बेंबळी: श्रीमती पुजा हणुमंत कुंभार रा. येवती (ह.मु. टाकळी)ता. उस्मानाबाद यांना विवाह झाल्यापासून मुलबाळ होत नाही या कारणावरुन सासरच्या कुटूंबातील लोक- हणूमंत कुंभार (पती) व सासु- सासरे, दोन दिर, एक जाऊ सर्व रा. येवती, ता. उस्मानाबाद यांनी वेळोवेळी शारिरीक व मानसिक त्रास दिला. अशा मजकुराच्या पुजा कुंभार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नमुद व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 34 अन्वये पो.ठा. बेंबळी येथे शुन्य क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्यातील घटनास्थळ हे ढोकी पो.ठा. अंतर्गत असल्याने सदर गुन्हा तपासकामी पो.ठा. ढोकी येथे हस्तांतरीत करण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, तामलवाडी: पुरुषोत्तम विष्णु ठोंबरे रा. मसला (खु.), ता. तुळजापूर हे दि. 19.05.2020 रोजी 18.40 वा. सु. मसला (खु.) येथील आपल्या शेतात होते. यावेळी सचिन अमृतराव रा. तुळजापूर, प्रदिप पाटील रा. सारोळा, ता. बार्शी व गावातीलच- धनंजय नरवडे, श्रीकांत नरवडे या सर्वांनी संगणमताने पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून पुरुषोत्तम ठोंबरे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पुरुषोत्तम ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 01.06.2020 रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: युवराज रंगनाथ जाधव, दयानंद युवराज जाधव दोघे रा. तुळजापूर या दोघा पिता- पुत्राने दि. 01.06.2020 रोजी आठवडी बाजार, तुळजापूर येथे शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन कॉलनीतीलच नातेवाईक- शंकर महादेव जाधव यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दयानंद जाधव यांनी शंकर जाधव यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या शंकर जाधव यांच्या फिर्यादीवरुन नमुद पिता- पुत्रा विरुध्द गुन्हा दि. 01.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: ज्ञानेश्वर उत्तम चव्हाण रा. म्होतरवाडी, ता. उस्मानाबाद हे दि. 01.06.2020 रोजी आपल्या शेताता होते. यावेळी त्यांच्या शेतातील पिकाची लावण करण्यासाठी तयार केलेल्या काकऱ्या महादेव संपत आंधळे रा. तेर हे तुडवत जात होते. यावर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी महादेव आंधळे यांना शेतातून न जाता बांधावरुन जाण्यास सुनावले. यावर त्यांनी ज्ञानेश्वर चव्हाण यांना शिवीगाळ करुन, विळ्याने वार करुन जखमी केले व शेतातील ढेकळे फेकून मारली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 01.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments