Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात विविध  गुन्हे दाखल 
मारहाण.
पोलीस ठाणे, भूम: मारुती काशीनाथ शिर्के, रा. चिंचोली, ता. भूम हे दि. 14.06.2020 रोजी गावातीलच आपल्या शेतात आपल्या पत्नी- मंदा हिच्यासह काम करत होते. यावेळी भाऊबंद असलेले पती- पत्नी जगन्नाथ शिर्के व वैशाली शिर्के या दोघांनी तेथे येउन शेतात दगड टाकण्याचा वाद उकरुन काढून मारुती शिर्के व त्यांची पत्नी मंदा हिस शिवीगाळ करुन, दगडाने मारहाण केली. हा दगड मारुती शिर्के यांच्या डोक्यात लागून जखम झाल्याने तीन टाके पडले आहेत. अशा मजकुराच्या मारुती शिर्के यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 18.06.2020 रोजी नोंदवला आहे.

रस्ता अपघात.
पोलीस ठाणे, मुरूम: सोहेल आयुबखॉ पठाण, रा. दाळींब, ता. उमरगा हे दि. 30.05.2020 रोजी 10.00 वा. सु. मौजे दाळींब येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर मो.सा. क्र. एम.एच. 13 सीएफ 3127 चालवत जात होते. दरम्यान आप्पासाहेब विठोबा सुरवसे, रा. दावल मलीकवाडी, ता. उमरगा यांनी मो.सा. क्र. एम.एच. 13 बीडब्ल्यु 6145 ही निष्काळजीपणे, चुकीच्या दिशेने चालवून सोहेल पठाण यांच्या मो.सा. ला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात सोहेल पठाण हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सोहेल पठाण यांच्या फिर्यादीवरुन नमूद मो.सा. चालका विरुध्द गुन्हा दि. 18.06.2020 रोजी नोंदवला आहे.

जुगार अड्ड्यावर छापे.”
पोलीस ठाणे,उस्मानाबाद (श.): 1)शकिल कासीमसाब तांबोळी 2)इरफान इस्माईल शेख 3)शेरखान खान 4)पंकज सुनिल काळे 5)मूक्तार शेख सर्व रा. उस्मानाबाद हे सर्वजन दि. 18.06.2020 रोजी अनुक्रमे एमएसईबी कार्यालया समोर व साठेनगर,उस्मानाबाद येथे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवीत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम एकत्रीत 2,910/-रु. च्या मालासह पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकास आढळले. यावरुन वरील सर्वांविरुध्द स्वतंत्र 2  गुन्हे दि. 18.06.2020 रोजी नोंदवले आहेत.


No comments