Header Ads

अंत्यविधीत गर्दी केली, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, तामलवाडी: 1)कालीदास मल्लीकार्जुन देवकर 2)रामदास मल्लीकार्जुन देवकर, दोघे रा. काटी, ता. तुळजापूर यांच्या भावाचा बाहेर गावी मृत्यु झाला होता. दोघा भावांनी ते प्रेत शासनाची रितसर परवानगी न घेता बाहेर गावाहुन मौजे काटी येथे आपल्या घरी आणले. तसेच दि. 11.06.2020 रोजी 05.30 वा. सु. मौजे काटी येथील स्मशानभुमीत त्या प्रेताचा अंत्यविधी करतांना 20 पेक्षा अधिक लोक जमवून गर्दी निर्माण करुन कोविड- 19 रोगाच्या संसर्गाची शक्यता निर्माण केली. अशा रितीने त्यांनी कोविड- 19 रोगप्रतिबंधक योजनांसंबंधी मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या तलाठी- प्रशांत गुळवे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दि. 17.06.2020 रोजी भा.दं.वि. कलम- 188, 269, 270, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रस्ता अपघात, दोन गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, उमरगा: रामसिंग बन्सीलाल राजपुत व रत्नाबाई मोहनसिंग राजपुत, वय 52 वर्षे, दोघे रा. आणुर, ता. आळंद, जि. गुलबर्गा हे दोघे दि. 10.06.2020 रोजी 20.00 वा. सु. मौजे कसगी, ता. उमरगा शिवारातील रस्त्याने मो.सा. क्र. के.ए. 32 ईएन 8246 ने प्रवास कर होते. यावेळी रामसिंग राजपुत यांनी नमूद मो.सा. निष्काळजीपणे, हयगईने चालवल्याने पाठीमागे बसलेल्या रत्नाबाई राजपुत या खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या हात मोडला आहे. अशा मजकुराच्या रत्नाबाई राजपुत यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन रामसिंग राजपुत यांच्या विरुध्द गुन्हा दि. 17.06.2020 रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, आनंदनगर: बालाजी उत्तम चव्हाण, रा. एम.आय.डी.सी., उस्मानाबाद हे दि. 13.06.2020 रोजी 22.30 वा. सु. मौजे सांजा शिवारातील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 1166 ही चालवत होते. यावेळी कार क्र. एम.एच. 25 एआर7456 च्या अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे चालवून बालाजी चव्हाण यांच्या मो.सा. ला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात बालाजी चव्हाण हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या बालाजी चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन नमूद वाहनाच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 18.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments