मोटारसायकलने धडक दिल्याने एक जखमी


उमरगा: राजेंद्र विश्वनाथ लादे रा. एकुरगा, ता. उमरगा हे दि. 02.06.2020 रोजी 17.00 वा. सु. मौजे एकुरगा येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी गावातीलच- संगाप्पा बसाप्पा शिरसे यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 5649 ही निष्काळजीपणे चालवून राजेंद्र लादे चालवत असलेल्या मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात राजेंद्र लादे यांच्यासह स्वत: जखमी झाला. अशा मजकुराच्या राजेंद्र लादे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 05.06.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद -  महेश औदुंबर उंबरे रा. वाघोली, ता. उस्मानाबाद यांच्या मौजे वाघोली शेत गट क्र. 214/1 मधे लावलेले ट्रॅक्टर ड्राईव्ह स्पीड ड्रील या कंपनीचे पेरणी यंत्र (किं.अं. 22,000/-रु.) दि. 04.06.2020 रोजी मध्य रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या महेश उंबरे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 05.06.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

उस्मानाबाद -  योगेश अरुण सातपुते रा. सौंदणे (ताड), ता. बार्शी यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. डीजी 2257 ही (किं.अं. 30,000/-) दि. 03.06.2020 रोजी 14.00 ते 15.00 वा. सु. उस्मानाबाद येथील सुनिल प्लाझा समोर लावलेली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या योगेश सातपुते यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 05.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments