Header Ads

आंदोलना दरम्यान पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखलपोलीस ठाणे, आनंदनगर: 1)अंबादास रघुनाथ गायकवाड, रा. तामलवाडी, ता. तुळजापूर 2)हरी मनोहर राऊत, रा. कासेगांव, ता. सोलापूर (द.) 3)सौदागर चंद्रहार टोपे, रा. धोत्री, ता. तुळजापूर हे सर्व त्यांच्या मागण्या संदर्भात दि. 15.06.2020 रोजी 10.40 वा. सु. मा. जिल्हाधिकारी, कार्यालय, उस्मानाबाद येथे आत्मदहन आंदोलन करण्यास जमले होते. आंदोलना दरम्यान त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना निवेदन देउन बाहेर आल्यानंतर त्यांनी एका प्लास्टीकच्या कॅनमधील रॉकेल अंगावर ओतण्यास सुरवात केली. त्यावेळी आंदोलन बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अनुचीत प्रकार घडू नये या उद्देशाने त्यांच्या हातातील कॅन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या तीघांनी पोलीस पथकास विरोध करुन धक्काबुक्की केली. यावेळी अंबादास गायकवाड याने आत्मदहनास प्रोत्साहन दिल्याने हरी राऊत व सौदागर टोपे या दोघांनी कॅन मधीन रॉकेल आपल्या अंगावर ओतून घेउन आत्महत्येचा प्रयत्न केला.
अशा प्रकारे नमूद तीघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींत पुरेसे अंतर राखन्याच्या संदर्भात मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन पोहेकॉ- अच्युत पोतदार यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 353, 309, 109, 188, 34 अन्वये गुन्हा दि. 15.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments