Header Ads

उस्मानाबाद : तुंबळ हाणामारी प्रकरणी दोन अटकेतउस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी दोन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. 

दि. 13.06.2020 रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यात दोन्ही गटांनी धारदार हत्याराचा वापर केला होता. यावरुन त्या दोन्ही गटांविरुध्द पो.ठा. आनंदनगर येथे गु.र.क्र. 164 व 165 /2020 हे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  नमूद दोन्ही गुन्ह्यांतील मुख्य पाहिजे आरोपी अनुक्रमे 1)युवराज आप्पाराव डुकरे, वय 25 वर्षे, रा. सांजा रोड, उस्मानाबाद 2)सुरज भगवान बोकेफोडे, वय 29 वर्षे, रा. दत्तनगर, उस्मानाबाद या दोघांस स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 14.06.2020 रोजी उस्मानाबाद शहरातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी पो.ठा. आनंदनगर च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि  पांडुरंग माने, आण्णाराव खोडेवाड, पोना- अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.

हाणामारीचे चार गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, ढोकी: विजयसिंह विष्णुपंत जमाले, रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद हे दि. 13.06.2020 रोजी 17.30 वा. सु. मौजे तडवळा शिवारातील आपल्या शेतात गेले होते. यावेळी भाऊबंद- आनंद पांडुरंग जमाले यांना सामाईक शेतबांध फोडल्याचा जाब विजयसिंह जमाले यांनी विचारला. त्यावर चिडुन आनंद जमाले, प्रतीक जमाले, गजानन जमाले यांनी विजचसिंह जमाले यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आनंद जमाले यांनी विजयसिंह जमाले यांच्या डोक्यात लोखंडी खोऱ्या मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या विजयसिंह जमाले यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 14.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तामलवाडी: युवराज गोरख रोकडे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर हे आपल्या कुटूंबीयांसह दि. 08.06.2020 रोजी 15.30 वा. सु. मौजे कदमवाडी शिवारातील आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत करत होते. यावेळी भाऊबंद- बाबु भागुजी रोकडे, रुक्मीनी, रोकडे यांनी युवराज रोकडे यांच्या शेतात जाउन आमच्या शेताच्या बांधावरुन ट्रॅक्टर का आणले. असे युवराज रोकडे यांना धमकावून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच रुक्मीनी रोकडे यांनी युवराज रोकडे यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या युवराज रोकडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 14.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: सचिन दत्तात्रय नरसिंगे, रा. सांजा रोड, शिवाजी नगर, उस्मानाबाद हे आपल्या कुटूंबीयांसह दि. 14.06.2020 रोजी 12.00 वा. सु. मौजे रामवाडी येथील आपल्या शेतात काम करत होते. यावेळी 1)विशाल वाकुरे 2)अमोल वाकुरे 3)राजेंद्र वाकुरे 4)अनिता वाकुरे सर्व रा. रामवाडी, ता. उस्मानाबाद 5)विजय गरड, रा. बिरवली, ता. औसा 6)सुनिल माळी व अन्य 15 व्यक्ती यांनी सचिन दत्तात्रय नरसिंगे यांच्या शेतात जाउन बेकायदेशीर जमाव जमवून शेतजमीनीच्या कारणावरुन सचिन नरसिंगे यांसह त्यांच्या कुटूंबीय व नातेवाईकांना शिवीगाळ केली. तसेच कुऱ्हाडीच्या तुंब्याने, काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सचिन नरसिंगे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 15.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: जगदीश भास्कर देवकर, रा. दाऊतपूर, ता. उस्मानाबाद हे आपल्या कुटूंबीयांसह दि. 14.06.2020 रोजी 14.30 वा. सु. मौजे दाऊतपुर येथील आपल्या शेतात होते. यावेळी गावातीलच- 1)साहेबराव पांढरे 2)बालाजी पांढरे 3)राजाभाऊ पांढरे 4)विकास पांढरे 5)परमेश्वर पांढरे 6)अजिनाथ पांढरे 7)तुकाराम पांढरे 8)नामदेव पांढरे 9)छायाबाई पांढरे 10)स्वाती पांढरे 11)सखुबाई पांढरे हे सर्व बेकायदेशीर जमाव जमवून जगदीश देवकर यांच्या शेतात गेले. यावेळी शेतातील रस्त्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा वाद उकरुन काढून जगदीश देवकर यांसह त्यांच्या कुटूंबीयांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या जगदीश देवकर यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 15.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments