Header Ads

उस्मानाबाद शहरात दोन गटात हाणामारी, दोन जखमी


उस्मानाबाद - दि. 13.06.2020 रोजी 18.00 ते 19.00 वा. चे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद येथे 1)बाळासाहेब बनसोडे 2)लल्या बनसोडे 3)भैयासाहेब नागटीळे 4)गोप्या बनसोडे 5)सुरज बोकफोडे 6)गौरव गायकवाड 7)आकाश बनसोडे सर्व रा. भिमनगर, उस्मानाबाद यांच्या गटाचा दुसऱ्या गटातील 1)लिंबराज डुकरे 2)युवराज डुकरे 3)किशोर डुकरे 4)शाम भोसले 5)गणेश माळी यांच्याशी पुर्वीच्या वादावरुन संघर्ष झाला. यात दोन्ही गटातील सदस्यांनी विरोधी गटातील सदस्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बांबू, तलवारीच्या सहायाने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. यात दोन्ही गटातील सदस्य अनुक्रमे लिंबराज डुकरे व सुरज बोकफोडे हे जखमी झाले.
अशा मजकुराच्या दोन्ही गटातील सदस्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परस्पर विरोधी गटाविरुध्द भा.दं.वि. कलम- 307, 143, 147, 148, 149, सह भारतीय हत्यास कायदा कलम- 3, सह ॲट्रॉसिटी कायदा अन्वये पो.ठा. आनंदनगर येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 14.06.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


पोलीस ठाणे, वाशी: आण्णासाहेब मनोहर डोके, रा. पारगांव, ता. वाशी हे दि. 14.06.2020 रोजी रात्री 00.30 वा. सु. आपल्या घरा बाहेर लघुशंकेस आले असता त्यांना पुतण्याच्या घरा समोरील मोटारसायकल जवळ दोन पुरुष दिसले. आण्णासाहेब डोके यांनी त्यांना हटकले असता त्या पैकी एका व्यक्तीने आण्णासाहेब यांच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारुन त्यांना जखमी केले. तर पारगांव येथीलच अरुण दगडू मोटे व कालिंदा अरुण मोटे या पती- पत्नीसही अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आण्णासाहेब डोके यांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द भा.दं.वि. कलम- 394 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: मंजुळा नारायण खांडेकर, रा. ईर्ला, ता. उस्मानाबाद या पती- नारायण खांडेकर यांसह दि. 13.06.2020 रोजी 15.00 वा. सु. माजे ईर्ला येथील आपल्या शेतात काम करत होते. यावेळी भाऊबंद- साहेबराव लिंबा खांडेकर यांनी तेथे येउन माझ्या शेतात दगड का ठेवला. असा जाब विचारून साहेबराव खांडेकर, नितीन खांडेकर, सचिन खांडेकर, पारुबाई खांडेकर या चौघांनी मंजुळा खांडेकर व त्यांचे पती- नारायण यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मंजुळा खांडेकर यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 13006.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: तात्या मुरलीधर गवळी, रा. रोसा, ता. परंडा यांनी दि. 13.06.2020 रोजी 09.30 वा. सु. मौजे रोसा येथील समाज मंदीरा जवळ पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून गावातीलच- दादाराव रामलिंग गव्हाळे यांना गच्चीला धरुन खाली पाडले. तसेच कुऱ्हाडीने वार करुन जखमी केले. पती- दादाराव गव्हाळे यांस होत असलेली मारहाण पाहून त्यांची पत्नी- प्यारनबाई गव्हाळे मारहाण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही तात्या गवळी यांनी कुऱ्हाडीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
अशा मजकुराच्या दादाराव गव्हाळे यांच्या फिर्यादीवरुन तात्या गवळी यांच्याविरुध्द गुन्हा दि. 13.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments