Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 


पोलीस ठाणे, भुम: लक्ष्मण निवृत्ती टाकळे, रा. राळसांगवी, ता. भूम हे दि. 10.06.200 रोजी 08.00 वा. सु. गावातील पाण्याच्या टाकी जवळील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात असतांना रस्त्यावर भाऊबंदां पैकी असलेले दत्ता टाकळे व भरत टाकळे हे उभे होते. त्यामुळे लक्ष्मण टाकळे यांनी मोटारसायकल जाण्यास रस्ता मोकळा होण्याकरीता त्यांना बाजूस होण्यास सांगीतले. यावर चिडून जाउन नमुद दोघांनी लक्ष्मण टाकळे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या लक्ष्मण टाकळे यांच्या तक्रारीवरुन नमुद दोघांविरुध्‍द गुन्हा दि. 11.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: किशोर चंद्रकांत राठोड, रा. दिपकनगर तांडा, ता. तुळजापूर यांनी गल्लीतीलच- राजेंद्र राठोड यांच्या अंगणात विटा ठेवलेल्या होत्या. त्या विटा उचलण्याच्या कारणावरुन राजेंद्र राठोड व अन्य एक व्यक्ती या दोघांनी दि. 11.06.2020 रोजी 17.00 वा. सु. दिपकनगर तांडा येथे किशोर राठोड व त्यांचे वडील चंद्रकांत राठोड यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या किशोर राठोड यांच्या फिर्यादीवरुन संबंधीतांविरुध्द गुन्हा दि. 11.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: सुवर्णा पवार, रा. नाईचाकुर, ता. उमरगा या दि. 10.06.2020 रोजी 21.00 वा. सु. राहत्या घरी असतांना मद्यपी असलेला त्यांचा पती- अविनाश पवार याने त्यांना मद्य पिण्यास पैसे मागीतले. यास पत्नीने नकार देताच चिडुन जाउन पती- अविनाश याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने विळीने पत्नी-सुवर्णा हिच्या अंगावर वार करुन तिला गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या सुवर्णा पवार यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन अविनाश पवार याच्याविरुध्द गुन्हा दि. 12.06.2020 रोजी नोंदवला आहे.

1 comment

AMBADAS V GORE said...

खुप वाईट परिस्थिती आहे ग्रामीण भागात....