Header Ads

तुळजापूर : मनाई आदेश झुगारुन तुळजाभवानी मंदीरात प्रवेश, गुन्हा दाखल
तुळजापूर -  कोविड- 19 रोगाच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचा तुळजाभवानी मंदीरात पुढील आदेशा पर्यंत जनतेच्या प्रवेशास मनाई आदेश आहे. तुळजाभवानी मंदीराची डागडुजी करण्यासाठी मंदीर प्रशासनाने संजय अशोक जमादार रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर यांना मंदीरात प्रवेश दिला होता. या संधीचा गैरफायदा घेउन संजय जमादार यांनी दि. 08.06.2020 राजी 09.30 वा. सु. सोबत पत्नीस घेउन तुळजाभवानी मदीरात जाउन दर्शन घेतले. यावरुन तुळजाभवानी मंदीर प्रशानाचे सहायक व्यवस्थापक यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीतांविरुध्द भा.दं.वि. कलम- 109, 188, 269 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मारहाण.

बेंबळी: बालाजी शिरसकर, कृष्णा शिरसकर, राम शिरसकर, शाम शिरसकर, वनिता शिरसकर सर्व रा. उमरेगव्हाण, ता. उस्मानाबाद यांनी दि. 08.06.2020 रोजी 12.30 वा. सु. महादेववाडी शिवारात बेकायदेशीर जमाव जमवून शेतजमीनीच्या कारणावरुन चंद्रकांत रामचंद्र चौधरी, रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. यावेळी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कृष्णा शिरसकर यांनी चंद्रकांत चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी कत्तीने वार करुन त्यांना जखमी केले. चंद्रकांत चौधरी यांना होत असलेली मारहाण सोडवण्यास आलेल्या त्यांच्या कुटूंबीयांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. अशा मजकुराच्या चंद्रकांत चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 10.06.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.
उस्मानाबाद (श.): रोहिणी संतोषकुमार नाईकवाडी, रा. यशवंतनगर, उस्मानाबाद यांच्या राहत्या घरातील दिवाणाखालील पिशवीत ठेवलेले रोख रक्कम 7,50,000/-रु. दि. 07.05.2020 ते 21.05.2020 या कालावधीत अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या रोहिणी नाईकवाडी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 10.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments