Header Ads

4 क्विंटल हळकुंड चोरी- 3 दिवसांत मुद्देमालासह 3 अल्पवयीन युवक ताब्यात


स्थानिक गुन्हे शाखा: सांगलीकडे हळकुंड घेउन जाणारा ट्रक क्र. एम.एच. 22 एए 0777 हा दि. 30.05.2020 रोजी रात्री 11.00 वा. सु. येरमाळा येथे महामार्गाच्या पुलाखाली थांबला होता. यावेळी चालक- अमोल रामराव राठोड रा. परळी, ‍जि. बीड यांनी ट्रकची पाहणी केली असता ट्रकच्या पाठीमागील बाजूचे टार्पोलीन फाडून आतील प्रत्येकी 50 कि.ग्रॅ. वजनाचे असे एकुण 4 क्विंटल हळकुंड असलेली 8 पोती किं.अं. 48,000/- रु. अज्ञाताने चोरुन नेल्याचे दिसले. यावरुन येरमाळा पो.ठा. गु.र.क्र. 78/2020 भा.दं.वि. कलम- 379 प्रमाणे दाखल आहे.
सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तेरखेडा, ता. वाशी येथून 3 अल्पवयीन युवकांना (विधी संघर्षग्रस्त बालक) ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला नमुद मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरीत तपासकामी त्या तीघांस येरमाळा पो.ठा. येथे हजर केले असुन त्यांना उस्मानाबाद येथील बाल न्याय मंडळा समोर सादर केले जाणार आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, विजय घुगे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, पांडुरंग सावंत यांच्या पथकाने केली आहे. 

No comments