Header Ads

उस्मानाबाद : सावकारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): पुतळाबाई धर्मा चव्हाण रा. साठे नगर, उस्मानाबाद यांनी पाताळ देवकते, दत्ता देवकते, दोघे रा. देवकते गल्ली, उस्मानाबाद यांच्याकडुन खाजगी कर्ज घेतले होते. देवकते बंधुंनी त्या कर्ज- व्याजाचा योग्य हिशोब न करता सुरुवातीला काही काळ पुतळाबाई यांच्याकडून व्याज वसूल केले. त्यानंतर उर्वरीत कर्ज रक्कम- व्याज वसूली करीता त्यांनी पुतळाबाई यांना गेल्या तीन महीन्यांत वेळोवेळी दमदाटी करुन शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या पुतळाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नमुद आरोपींविरुध्द सावकारी कायदा कलम- 31, 39, 45 सह, भा.दं.वि. कलम- 504, 506 अन्वये गुन्हा दि. 01.06.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, वाशी: सिंधुबाई राजाराम हाके रा. सरमकुंडी, ता. वाशी या त्यांच्या कुटूंबीयासह दि. 31.05.2020 रोजी 12.00 वा. सु. आपल्या शेतात होते. यावेळी गावातीलच भाऊबंद- दादासाहेब दगडु हाके, हणुमंत हाके, भाऊसाहेब हाके, विकास हाके, आकाश हाके यांनी सामाईक शेतबांधावर दगड रोवण्याच्या कारणावरुन सिंधुबाई हाके व त्यांच्या कुटूंबीयांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच शेतात पाय ठेवला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सिंधुबाई हाके यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 31.05.2020 रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, ढोकी: सत्यजित शिवलींग चिवटे, शिवशक्ती चिवटे, सुरज चिवटे, शिवलींग चिवटे सर्व रा. तेर, ता. उस्मानाबाद यांनी दि. 31.05.2020 रोजी 11.00 वा. सु. पुर्वीच्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन गावातीलच नातेवाईक- अश्विनी चिवटे व गंगाधर लवटे यांना त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अश्विनी चिवटे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 31.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments