Header Ads

उस्मानाबाद ; पोलीसांच्या सतर्कतेने बालक 5 तासांत मातेच्या कुशीत

उस्मानाबाद -  आनंदनगर पो.ठा. चे पथक आज दि. 01.06.2020 रोजी सकाळी गस्तीवर असतांना सुमारे 7.00 वा. उस्मानाबाद एसटी बस स्थानकात एक 4 वर्षीय मुलगा एकटाच फिरतांना आढळला. पोलीसांनी त्यास गोडगप्पा मारुन, बोलते करुन पो.ठा. आनंदनगर येथे आनले. त्या बालकाचे वर्णन पोलीस ठाण्यातील इतर सहकाऱ्यांना कळवून पोलीस पथका मार्फत बालकाच्या माता- पित्यांचा शोध घेण्यात आला. यावेळी हा मुलगा समर्थ नगर, उस्मानाबाद येथील गणेश राम आरबळे, वय 4 वर्षे असुन वाट चुकून बस स्थानकात आल्याचे समजले. पोलीसांनी त्याची आई श्रीमती विजया राम आरबळे यांच्याशी संपर्क साधून 12.30 वा. बालकास त्यांच्या स्वाधीन केले. 

पाहिजे (Wanted) आरोपी अटकेत.

स्थानिक गुन्हे शाखा -  बाबासाहेब गणपती गिलबिले, रा. परंडा हे पो.ठा. परंडा गु.र.क्र. 133/2020 भा.दं.वि. कलम- 307, 324, 34 या गुन्ह्यात पाहिजे होता. त्यास स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 01.06.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी परंडा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, विजय घुगे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, पांडुरंग सावंत यांच्या पथकाने केली आहे.

No comments