Header Ads

चोरी करतांना चोर ताब्यात उमरगा: दिग्वीजय कैलास शिंदे, रा. पंचशील कॉलनी, उमरगा यांच्या राहत्या घरात दि. 10.06.2020 रोजी सायंकाळी 07.45 वा. महेश ईराण्णा वजनदार, रा. हुमनाबाद, ता. बिदर, हा संधी साधून चोरी करण्याच्या उद्देशाने घुसला. शयनगृहातील कपाट उघडून तो सामान अस्ताव्यस्त करत असतांना दिग्वीजय शिंदे यांच्या कुटूंबीयांनी त्यास पकडले. ही हकीकत त्यांनी पोलीसांना कळवल्यावरुन पोलीसांनी घटनास्थळी जाउन चोरट्यास ताब्यात घेतले. अशा मजकुराच्या दिग्वीजय शिंदे यांच्या तक्रारीवरुन नमुद व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 11.06.2020 रोजी नोंदवला आहे.

लॉकडाउन: दि. 10.06.2020 रोजी 10 पोलीस कारवायांत 2,000/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1) सार्वजनिक स्थळी थुंकणे: 7 कारवायांत- 1,400/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2) सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 3 कारवायांत 600/-रु. दंड प्राप्त झाला आहे.

No comments