Header Ads

चोरीच्या 6 मोटारसायकलसह संशयीत ताब्यातउस्मानाबाद : स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे घाटंग्री, ता. उस्मानाबाद येथील बंजारा तांड्यावर राहणारा सागरसिंह महादेव राठोड, वय 26 वर्षे यास दि. 21.06.2020 रोजी मौजे वरुडा, ता. उस्मानाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा.- 3, हिरो एचएफ डिलक्स मो.सा.- 2, होंडा शाईन मो.सा.- 1 अशा एकुण 6 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. त्या मोटारसायकल त्याच्या ताब्यात असण्याबाबत, मालकी बाबत तो समाधानकारक उत्तरे देउ शकला नाही. पोलीस पथकाने वाहन पोर्टलद्वारे गाड्यांच्या मालकी बाबत खातरजमा केली असता त्यातील 4 मो.सा. या सोलापूर जिल्ह्यातील तर 2  मो.सा. या पुणे जिल्ह्यातील असल्याचे समजले. तसेच या 6 मोटारसायकल पैकी 3 मो.सा. या चोरीस गेल्या बाबत सोलापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे समजले. यावरुन नमूद मोटारसायकलसह आरोपी- सागरसिंह महादेव राठोड यास ताब्यात घेउन त्याच्याविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) येथे गु.र.क्र. 139/2020 म.पो.का. कलम- 124 अन्वये नोंदवला असुन उर्वरीत तपासकामी सोलापूर, पुणे पोलीसांची मदत घेतली जाणार आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि.  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि  आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, खोत, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, पोकॉ- आशमोड यांच्या पथकाने केली आहे. 

No comments