Header Ads

कळंब : अल्पवयीन मुलीचे अपहरण
कळंब: एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 26.06.2020 रोजी 17.00 वा. सु. “मी चुलत बहिणीच्या घरी जाउन येते.” असे कुटूंबीयांस सांगून घरा बाहेर गेली. परंतु ती घरी परतली नाही. यावरुन तीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात  कारणासाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडिलांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 27.06.2020 रोजी नोंदवला आहे.


बालकांचे लैंगीक शोषण प्रकरणी 2 बालकांविरुध्द गुन्हा दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात असणाऱ्या एका वस्तीगृहातील (नाव- गाव गोपनीय) दोन अल्पवयीन मुलांनी त्याच वस्तीगृहातील दोन अल्पवयीन मुलांचे दि. 23.06.2020 रोजी रात्री 11.30 वा. लैंगीक शोषण केले. ही हकीकत त्या पिडीत मुलांनी वस्तीगृह अधीक्षक यांना दि. 25.06.2020 रोजी सांगीतली. यावरुन वस्तीगृह अधीक्षकांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत दोन अल्पवयीन मुलांविरुध्द पोक्सो कायदा कलम- 4 अन्वये गुन्हा दि. 26.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments