Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल 


पोलीस ठाणे, तुळजापूर: अंगद बापुराव मगर, रा. रायखेल, ता. तुळजापूर हे दि. 17.06.2020 रोजी 18.00 वा. सु. मौजे रायखेल येथील भातंब्री रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी गावातीलच भाऊबंद- राजेंद्र राघु मगर व पवान राजेंद्र मगर या दोघा पिता- पुत्रांनी शेतजमीनीच्या वाटणीच्या कारणावरुन मोटारसायकल अंगद मगर यांच्या पायावरुन घातल्याने ते जखमी झाले. तसेच अंगद मगर यांना लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अंगद मगर यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 17.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, वाशी: बिभीषन रामभाऊ बाराते, रा. जानकापुर, ता. वाशी हे दि. 17.06.2020 रोजी 14.00 वा. सु. मौजे जानकापूर येथील आपल्या शेतातील बांधावर मशागत करत होते. यावेळी शेतशेजारी सुरज भारत कोकणे यांनी शेत मशागतीच्या कारणावरुन बिभीषन बाराते यांना शिवीगाळ- धक्काबुक्की करुन, लाकडी रुमण्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बिभीषन बाराते यांच्या फिर्यादीवरुन सुरज कोकणे यांच्याविरुध्द गुन्हा दि. 17.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: राज प्रकाश पाटील, रा. टाकळी (ढोकी), ता. व त्यांचा चुलत भाऊ- लखन पाटील हे दोघे दि. 16.06.2020 रोजी 16.00 वा. सु. आपल्या शेतात होते. यावेळी लखन पाटील यांचा सामाईक शेतबांध फोडल्याचा जाब शेतशेजारी- रवि मुळे यांना विचारला असता त्यावर रवि मुळे यांनी भाऊबंद- बाबुराव मुळे, ज्ञानू मुळे, बाळु मुळे यांच्या मदतीने लखन पाटील व राज पाटील या दोघांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, मारहाण केली. बाबुराव मुळे याने राज पाटील यांच्या बोटास चावा घेउन जखमी केले. अशा मजकुराच्या राज पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 17.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): नितीन राठोड, रा. जहागीरदारवाडी, ता. उस्मानाबाद व त्यांची पत्नी- अनिता राठोड असे दोघे दि. 17.06.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर बसले होते. यावेळी गावकरी- दिलीप राठोड, राजेंद्र राठोड, शामकाबाई राठोड, विलास राठोड या सर्वांनी पुर्वीच्या भाडणाची कुरापत काढून नमूद दोघा पती- पत्नीला शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कोयत्याने, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अनिता राठोड यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 17.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments