Header Ads

बियाणे चोरीतील आरोपी मुद्देमालासह अटकेतउस्मानाबाद - महिको कंपनीचे कापसाचे बियाणे चोरणाऱ्या एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. 

 पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.)गु.र.क्र. 33/2020 भा.दं.वि. कलम- 379 या गुन्ह्यात पाहिजे आरोपी- नाना सायबा पवार, वय 44 वर्षे, रा. लोणखस पारधी पिढी यास स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले महिको कंपनीचे कापूस बियाण्याची प्रत्येकी 730 रुपये किंमतीचे 117 पुडे असा एकुण- 85,410/-रु. चा माल दि. 16.06.2020 रोजी जप्त केला आहे. उर्वरीत तपासकामी आरोपीस पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे.

No comments