Header Ads

गुटखा वाहतुक करणाऱ्या चौघांविरुध्द गुन्हा दाखलउस्मानाबाद - गुटखाची  वाहतूक करणाऱ्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

 1)बालाजी माणिक सावंत 2)रामेश्वर अशोक कुंभार 3)गणेश अभिमन्यु मोहिते 4)विश्वजीत अशोक कुंभार, चौघे रा. सांजा, ता. उस्मानाबाद हे चौघे दि. 25.06.2020 रोजी स्वीफ्ट डिझायर कार क्र. एम.एच. 25 जीझेड 1479 मध्ये महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्नपदार्थ- गुटखा 80 पुडे व सुगंधी तंबाखु 80 पुडे (किं.अं. 96,800/-रु.) अवैध विक्रीसाठी वाहतुक करत असतांना स्था.गु.शा. च्या पथकास पारधी पिढी, उस्मानाबाद येथे आढळले.

सदर अन्नपदार्थ हा प्रतिबंधीत गुटखा असल्याची खात्री करुन अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणूका पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द पो.ठा. आनंदनगर येथे भा.दं.वि. कलम- 188, 272, 273 सह, अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27, 30 अन्वये गुन्हा दि. 26.06.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.  (सोबत छायाचित्र जोडले आहे.)


दोन वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी अटकेत

 तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 286/2018 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- विनायक शंकर पौळ उर्फ ममड्या, वय 24 वर्षे, रा. मातंगनगर, ता. तुळजापूर हा मागील दोन वर्षां पासून पोलीसांना तपासकामी हवा होता. स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे त्यास आज दि. 27.06.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी आरोपीस पो.ठा. तुळजापूर च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- रोकडे, पोकॉ- पांडुरंग सावंत, बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.

No comments