Header Ads

धान्याचा काळाबाजार : तुगांवच्या ३ स्वस्त धान्य दुकानांचा परवाना रद्दउमरगा -   धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी  तुगांव येथील तीन स्वस्त धान्य दुकानांचे परवाना रद्द करण्यात आला आहे.  जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ चारुशीला देशमुख यांनी २२ मार्चला भेट देऊन तपासणी केली असता अनेक घोटाळे उघडकीस आले होते.  अखेर  जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दुकानाचे परवाने रद्द केल्याचे आदेश काढले.

 यामध्ये दुकानदार नामेश्वर मधुकर स्वामी यांचे दुकान क्रमांक १ यांच्या दुकानात मंजूर गहू नियतन आणि पूर्वीचे शिल्लक, ई पॉस मशिनद्वारे केलेले वितरण व शिल्लक गहू यात तफावत दिसून आली असून त्यात तीन क्विंटल ८४ किलो शिल्लक असणे अपेक्षित असताना दुकानात दोन क्विंटल ३० किलो माल शिल्लक आढळून आला. पूर्वीचे शिल्लक तांदूळ व ई पॉस मशिनद्वारे पाहणी केली असता सदर दुकानात ३३ क्विंटल ९० किलो तांदुळ शिल्लक आढळून आले. परिवर्तन सावित्रीबाई फुले महिला बचत गट दुकान क्रमांक तीनच्या तपासणीत दोन क्विंटल ८३ किलो गहू शिल्लक असणे अपेक्षित असताना १३ क्विंटल ७३ किलो गहू जास्त आढळून आला तर एकूण मंजूर तांदळाच्या वितरनानंतर ५१ क्विंटल ७९ किलो तांदूळ शिल्लक असणे अपेक्षित आहे मात्र दुकानात ४६ क्विंटल ७५ किलो तांदूळ शिल्लक आढळून आला. विलास भोजा राठोड यांच्या दुकान क्र २ मध्ये स्वस्त धान्य दुकानात सहा क्विंटल तीन किलो गहू शिल्लक असने अपेक्षित असताना तपासणीत सात क्विंटल १० किलो गहू शिल्लक आढळून आले. एकूण मंजूर तांदळाच्या नियतनात वाटपानंतर २८ क्विंटल ५२ किलो तांदुळ शिल्लक असणे अपेक्षित आहे पण तपासणी वेळी दुकानात ३१ क्विंटल २० किलो तांदूळ शिल्लक आढळून आला. संबंधित तीन दुकानदार यांना याबाबतीत खुलासा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली, मात्र समाधानकारक खुलासा सादर न केल्याने शिवाय कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुकानाच्या दर्शनी भागावर ठराविक नमुन्यात साठा फलक नसणे, दुकानदार दक्षता समिती समोर धान्य वाटप न करणे, दक्षता समितीचा फलक न लावणे या कारणानेही कारवाई करण्यात आली आहे.

No comments