Header Ads

मनाई आदेश झुगारुन उपोषण- आंदोलन केले, गुन्हा दाखल



पोलीस ठाणे, उमरगा: कोविड- 19 रोगाचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून जिल्हाभरात गर्दी निर्माण करण्यास, रस्ता रोको, उपोषण, मोर्चा इत्यादी आंदोलनास मनाई आहे. असे असतांनाही हा मनाई आदेश झुगारुन दि. 17.06.2020 रोजी 11.00 वा. चे पासून तहसील कार्यालय, उमरगा येथे सुरेश भिवा कांबळे, रा. मुरुम, ता. उमरगा हे पत्नी- सुनीता, आई- अंदाबाई, मुलगा- प्रशांत यांसह उपोषणास बसले. यावरुन पोलीसांनी त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.



लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 21 वाहने जप्त.”

पो.ठा. कळंब: लॉकडाउन असतांनाही दि.16.06.2020 रोजी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन, जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन वाहनासह रस्त्यावर फिरणाऱ्यांची 21 वाहने पो.ठा. कळंब यांनी ताब्यात घेतली आहेत.

No comments