Header Ads

इंदापूर येथे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान

 पंचनामे करण्याचा  खासदार ओमराजे यांचा  आदेश 


          उस्मानाबाद -वाशी तालुक्यातील इंदापूर गावात व परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड, साठवलेल्या कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच विजेचे खांब पडले आहेत. या नुकसानीबाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
    यावेळी तहसीलदार संदिप राजपुरे,जि.प.सदस्य उद्धव साळवी, बाबा घोलप, अड.सत्यवान गपाट, महावितरणचे श्री. हिंगमीरे, तलाठी श्री. थोरबोले, अड. कोरे , अड. मोगल, हिंदुराज गपाट, अमित गपाट, सुंदर पारडे, पोलिस पाटील बालाजी पारडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.सास्तुर येथील स्पर्श ग्रामिण रुग्णालयास भेटखासदार ओमराजे निंबाळकर

        दि. 10 जून रोजी सास्तुर ता. लोहारा येथील स्पर्श ग्रामिण रुग्णालयास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट दिली. या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यविषयक सोयी सुविधांची पाहणी करून येथील दर्जात्मक सुविधा बद्दल गौरवोद्गार काढले.

        यावेळी आ. कैलास घाडगे-पाटील, जि.प.सदस्य दिपक जवळगे, नामदेव मामा लोभे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, गटविकास अधिकारी अशोक काळे, नायब तहसीलदार श्री.शिराळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ कठारे, तलाठी श्री.कोकाटे ग्रामसेवक श्री. बिराजदार, पोलीस पाटील, विस्तार अधिकारी निंबाळकर, डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.

No comments